फुले दांपत्यांनी मानवमुक्तीची चळवळ पुढे नेली.#
-- धम्मज्योती गजभिये
श्री अमिर मुलानी यांनी ” सावित्रीमाईची लेक शिकली शाळा ” हे गित सादर केले.
बार्टीतील समतादुत श्रीमती उषा कांबळे यांनी ” मि सावित्री बोलते” हे एकपात्री प्रयोग सादर करुन सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जिवनातील प्रसंग सादर केला. त्यांनी ३९५ प्रयोग सादर करुन सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचा प्रसार व प्रचार केल्याबदल मा. महासंचालक गजभिये यांच्या हस्ते ” महामानव” हे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन श्रीमती सुनंदाताई गायकवाड, प्रकल्प अधिकारी यांनी केले.
आभार श्रीमती नसरिम तांबोळी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक यांनी आभार मानले.

पुणे – दिनांक ३ जानेवारी प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी येथील समाज व्यवस्तथेविरुद्ध बंड करून समतेचा मार्ग मोकळा केला छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा जोतीराव फुले ,राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले .
फुले दांपत्यांनी मानवतेच्या मुक्तीसाठी संघर्ष केला म्हणूनच आज आपण स्वतंत्र समता बंधुभाव यांचा उपभोग घेत असून बार्टी तील विशेष कक्ष विभागाने दुर्बल घटकातील महिलांच्या उत्थानासाठी काम करावे प्रकल्प उभारावा असे प्रतिपादन बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले .
मंगळवार दिनांक ३जानेवारी २०२३ रोजी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गंज पेठ पुणे फुलेवाडा, येथील पूर्णाकृती पुतळ्यास बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, श्रीमती स्नेहल भोसले, विभागप्रमुख, श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
बार्टी मुख्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये, श्री प्रविण देवरे, विभागप्रमुख, सीव्हीसी विभाग, श्रीमती स्नेहल भोसले, विभाग प्रमुख, योजना विभाग, श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
श्री राजेन्द्र बरकडे लेखाधिकारी, कार्यालय अधीक्षक श्री सचिन जगदाळे, श्रीमती प्रज्ञा मोहिते, संध्या नारखडे, अॕड प्रियदर्शनी तेलंग, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, डॉ प्रेम हनवंते, डॉ सारिका थोरात, श्रीमती सुभागी सुतार, महेश गवई , सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नरेश गोटे, डॉ संभाजी बिराजे, डॉ अंकुश गायकवाड, मंजुर तडवी, विशाल शेवाळे, आदी उपस्थित होते.
श्रीमती संध्या नारखडे, श्रीमती गौरी सोनवणे सिव्हीसी विभागातील महिलांनी सावित्रीबाई फुले यांची ओवी सादर केली.