
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलमार्फत आयोजित ७० व्या वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन
निवेदक : मेश्राम बी. बी. संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र.
संपर्क : ९४२१६७८६२८
सुशिक्षित करा, संघर्ष करा, संघटीत करा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका.
(Educate, Agitate, Organise, Be Faithful and Be Hopeful.)
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल : PHULE SHAHU AMBEDKARITE STUDY CIRCLE.
दि आल इंडिया नाग असोसिएशन : THE ALL INDIA NAG ASSOCIATION.
70th Workshop : Sunday Special : Holiday School for All : Buddhist Seminary cum Training School for WELLWISHERS of the Revolutionary Movement.
मित्र👭👬👫 हो,
आपली उपस्थिती स्वागतार्ह आहे.
दिनांक : २० ऑक्टोबर २०२४, विशेष रविवार.
वेळ : दुपारी २:३० वाजता.
विषय : १९ ऑक्टोबर १८८२ ला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनला सादर केलेले निवेदन आणि आजची प्रासंगिकता.
उद्घाटक : मा. एड. पवन साळवे. (सामाजिक कार्यकर्ते, छत्रपती संभाजी नगर)
सहभाग : नोंदणीकृत उपस्थित सर्व प्रतिनिधी.
विशेष उपस्थिती : मा. एड. प्रतिभा साळवे (सामाजिक कार्यकर्त्या)
प्रमुख वक्ते : मा. एड. राजू बागूल (हायकोर्ट, औरंगाबाद)
अध्यक्षता : मा. मेश्राम बी. बी. (संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, छत्रपती संभाजी नगर)
स्थळ : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे जनसंपर्क कार्यालय, ४, साकेत नगर (पेठे नगर), भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र.
फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (AINA : आईना) च्या संयुक्त विद्यमाने फुले शाहू आंबेडकराईट चळवळ समजून घेण्यासाठी ७० व्या वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे.
मित्र 👭👬👫 हो,
महाकवि वामन दादा कर्डक म्हणाले होते की, बुद्ध कबीर भीमराव फुले, त्यांनी जनजीवन फुलविले। याची जाणीव ठेवून बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकरांच्या वैचारिक आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या आदर्शांचे वैचारिक आंदोलन समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण अनुयायी म्हणून त्यांच्या पश्चात काय करीत आहोत? आपल्या पक्ष, संघटना, संस्था नेमकेपणाने काय भूमिका पार पाडत आहेत? याची समर्पक उत्तरे शोधण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण सर्वांना ज्ञात आहेच की, १९ ऑक्टोबर १८८२ ला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशनला निवेदन सादर केले होते. त्या कृतीच्या १४२ व्या वर्धापनदिनानिमित्त, त्या अनुषंगाने फुले शाहू आंबेडकराईट समाज नेमकेपणाने कुठल्या वळणावर आहे? व्यक्ती परत्वे मते मतांतरे असू शकतात. तरी सर्वांचे म्हणणे समजून घेणे हा संवाद प्रक्रियेचा भाग आहे. त्याची चिकित्सा होऊन वास्तविकता कळावी. या उद्देशाने फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व दि आल इंडिया नाग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने प्रासंगिकता लक्षात घेऊन सदरील ज्वलंत विषयावर ७० व्या वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. जेणेकरून फुले, शाहू, आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना अद्ययावत (Update) आणि Upgrade करून, करवून घेता येईल. परिणामी समग्र बुद्ध कबीर फुले शाहू पेरियार आंबेडकराईट आंदोलनाच्या कार्यात वृद्धी होऊ शकेल. या आंदोलनाचा कारवाँ पुढे घेऊन जाण्यासाठी आपली सक्रिय सहभागिता सहाय्यकारी होऊ शकेल. आपण सर्वांनाच प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त होण्यासाठी संधी दिली जाईल. करिता ९४२१६७८६२८ या क्रमांकावर नोंदणी करावी. तसेच केवळ ऐकण्यासाठीच नव्हे! तर समजावून सांगण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी मित्र परिवारासह उपस्थित राहावे. जेणेकरून पुढे चळवळीच्या प्रक्रियेला वेगाने गतिमान करण्यासाठी कृती कार्यक्रम ठरविता येईल.
टीप : कार्यक्रमाला वेळेवर येऊन पूर्ण वेळ का ऐकावे?
कारण : आपण वेळेवर आल्याने कार्यक्रम वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपेल. तसेच कार्यक्रमाला वेळेवर येऊन पूर्णवेळ ऐकल्यास विषयांचे अनुषंगाने आपले पूर्ण मत तयार होईल. अन्यथा अर्धवट ऐकल्यास अर्धवटच मत तयार होईल.
तसेच,
इच्छा असूनही जे हितचिंतक सेमिनार, कार्यशाळेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी आपआपल्या परिसरात अशा सेमिनार, कार्यशाळांचे आयोजन करावे. जेणेकरून “भारताचे संविधान” प्रमाणे मानवतावादाचे अनुषंगाने जनमत संघटीत होऊ शकेल.
आपले हितचिंतक : एड. विलास रामटेके, डॉ. आर. डी. बडगे, डॉ. रमेशचंद्र धनेगांवकर, डॉ. जोगेंद्र पांचगांवकर, डॉ. कैलास झिने, डॉ. व्ही. एच. कांबळे, महादेव डांबरे, टी. एन. थोरात, गोविंद कांबळे, साधू आनंद, एड. राजू बागूल, प्रा. मंगला झिने, एड. आर. टी. खंदारे, मोहसिन पटेल, सोहेल पटेल, अरुण इंगळे, राहुल मेश्राम व समस्त सन्माननिय नागरीक, छञपती संभाजी नगर (औरंगाबाद), ४३१००२
संपर्क : ९४२१६७८६२८, ८२७५३०५३६९, ९४२३४५६०८६, ९९६०३४६०५४, ९९६००५२९४०, ९८२२५१८२७९, ९७६३९६१९५७, ८६००६२१६३६, ९८२२७६८२६५, ९४२२२२४२५८, ७३८७२८२२२०, ९६६५०४७१५३, ९४०५६५१४१४.