आठवडी बाजारात जात पडताळणीचे फार्म भरून घ्यावेत — आयुक्त बकोरिया
पुणे – 24 जुलै प्रतिनिधी
अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी बार्टी व समाज कल्याण विभागाच्या वतीने काम करण्यात येत असून भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्यासाठी यूपीसी व कौशल्य विभागामार्फत दर्जेदार पद्धतीचे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ तसेच बार्टी संस्थेचे कार्य अत्यंत चांगले प्रेरणादायी असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बार्टी व समाज कल्याण विभाग एकत्रितपणे काम करतील . नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र जलदगतीने मिळण्यासाठी बार्टीने राज्यातील आठवडी बाजारात जात पडताळणीचे फार्म भरून घेण्यासाठी शिबिर आयोजित करावेत अशी निर्देश समाज कल्याणचे आयुक्त मा. ओमप्रकाश बकोरिया यांनी बार्टी संस्थेत बोलताना व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मा .ओमप्रकाश बकोरिया व मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
मा. महासंचालक सुनिल वारे यांनी मा. आयुक्त बकोरिया यांना भारतीय राज्यघटनेची प्रत व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे समाज कल्याण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मा. बकोरिया यांनी बार्टी मुख्यालयास भेट देऊन बार्टी संस्थेचा आढावा घेतला.
यावेळी बोलतांना मा. वारे म्हणाले की, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नागरिकांना जात पडताळणी जलद पद्धतीने मिळण्यासाठी राज्यातील आठवडी बाजारात फार्म भरून घेणे व त्यांची प्रकरणे तात्काळ निकाली काढावे हा त्यांचा निर्णय जनतेप्रती त्यांची असलेली तळमळ दिसून येते निश्चितपणे यावर आम्ही काम करू असे आश्वासित केले.
बार्टी संस्थेचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी मा. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचे स्वागत करताना म्हणाले की विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या महत्त्वपूर्ण बार्टी संस्थेचे कार्य मा. आयुक्त व मा. महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने करून अनुसुचित जातीच्या घटकांना न्याय देऊ असे आश्वासन प्रस्ताविक करतांना व्यक्त केले .
याप्रसंगी श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक, बार्टी, विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती स्नेहल भोसले, अनिल कांरडे, आरती भोसले, रविन्द्र कदम, वृषाली शिंदे, लेखाधिकारी योगिता झानपुरे, सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बरकडे, कार्यालय अधिक्षक डॉ संध्या नारखडे, प्रज्ञा मोहिते, सचिन जगदाळे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले.