बहुगुणी ऊसाच्या रसाचे १० फायदे
ऊसाचा रस सर्वत्र सहज उपलब्ध असतो. या ऊसाच्या रसामध्ये लौह धातु, कॅल्शियम, क्रोमियम, मॅगनेशियम, पोट्याशियम,झिंक हे धातु, तसेच व्हिटॅमिन अ, बी, सी, प्रोटिन्स, विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणात असते.
१) कावीळ या आजारामध्ये ऊस चाउन खाणे किंवा ऊसाचा रस पिणे अत्यंत फायदेशीर आहे.
२) ऊसाच्या रसामध्ये कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी लढण्याची क्षमता असल्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांनी नियमित उस चावुन खावा किंवा ऊसाचा रस प्यावा.
३) लिव्हर साठी ऊस अत्यंत शक्तीवर्धक आहे. लिव्हरच्या आजारामध्ये लिव्हरच्या पेशींना बळ देण्याचे कार्य ऊसातील घटकांद्वारे होते.
४) लघवी मध्ये जळजळ होणे, लघवी मार्गात जंतुसंसर्ग होणे अशा आजारांमध्ये ऊसाचा रस नियमित घेतल्याने खुप फायदा होतो.
५) ऊसामध्ये असलेल्या उच्च मात्रेतील पोटॅशियम मुळे ह्रदयाच्या पेशींना बळ मिळ्ते, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होते, उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
६) याशिवाय रक्तातील रक्त शर्करा नियंत्रित ठेवणे, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे,घश्याचे आजार, फ्लु सारखे आजार प्रतिबंध, शरीराचे तापमान नियंत्रण करणे, शरीराचे वजन नियंत्रण करणे अशा आजारामध्ये ऊसाचा किंवा ऊसाच्या रसाचा फायदा होतो.
७) पोट साफ होण्यासाठी व लघवीचे प्रमाण वाढविण्यासाठी ऊसाच्या रसाचा चांगल्याप्रमाणात फायदा होतो.
८) मुतखडा, लघवीचे अल्प प्रमाण, लघवी साफ न होणे अशा आजारावर ऊसाचा चांगला फायदा होतो.
९) उन्हाळ्यातील उष्माघातापासुन बचाव करण्यासाठी उसाचा रस अत्यंत उत्तम आहे.
१०) उन्हाळ्यात घोळाणा फुटणे, लघवीतून रक्त जाणे अशा व्याधीवर याचा उपयोग होतो.
आठवड्यातून एक वेळा ऊसाचा रस नियमित प्यावे. वजन कमी करण्यासाठी उसाचा रस उत्तम असतो. मधुमेही रुग्ण देखील उसाचा रस पिऊ शकतात.
क्रमशः……..

ByAgro India

Dec 23, 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp