पूणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व राज्य शासनाच्या मदतीने देण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षणातून लाभ घेतलेल्या अनुसूचित जातीतील 15 विद्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी.- राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
एम.पी.एस.सी.- राज्यसेवा परीक्षा 2019 मध्ये विजय सूर्यवंशी, गौरव इंगोले, हेतल पगारे यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली; पूनम धिंगाणे यांची महाराष्ट्र खाते आणि वित्तसेवा; शिंदे नेहा, श्रीकांत कांबळे यांची तहसीलदार पदी निवड झाली; कांबळे चेतन यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली; गडलिंग अक्षय, गाडगे निखील, निकाळजे बुद्धभूषण यांची नायब तहसीलदार पदी निवड झाली; आरती गवई, निलेश सातपुते, तुषार आठवले व सायली चिखलीकर यांची ग्रुप बी पदी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महासंचालक (बार्टी) व बार्टी परिवारातर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp