बार्टी संस्थेच्या महासंचालकपदी मा. सुनील वारे सर रुजू

पुणे दिनांक 9 मार्च प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे संस्थेच्या महासंचालकपदी महाराष्ट्र शासनाने मा. सुनील वारे यांची 8 मार्च 2023 रोजीच्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली. आज मा. महासंचालक सुनिल वारे सर यांनी बार्टी संस्थेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी , यांनी मा. वारे यांना “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र” हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.बार्टी महासंचालक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मा. वारे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील ज्ञानाचे एकमेव प्रतीक असून त्यांच्या नावाने असलेल्या संस्थेत मला काम करण्याची संधी मिळाली यांचा मला अभिमान असुन बार्टी संस्थेचा नावलौकिक उंचावण्यासाठी आपण काम करू असे मनोगत व्यक्त करुन त्यांनी बार्टी संस्थेतील विविध विभागांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच कामकाजाची माहिती घेतली.
मा. सुनील वारे हे रेल्वे मंत्रालयात विजीलंस क्लिअरन्स या विभागात मोठ्या पदावर कार्यरत होते. त्यानंतर रेल्वेच्या लेखा विभागात ही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती . त्यांनी आसाम, बंगाल व ईतर राज्यांमध्ये सुध्दा यशस्वी कार्य केले आहे आसाममध्ये प्रथमच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. कामकाजातील पारदर्शकता ही त्यांच्या कामाची ओळख आहे.
यावेळी श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी, विभागप्रमुख श्रीमती स्नेहल भोसले, डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण, श्रीमती वृषाली शिंदे, रविन्द्र कदम, अनिल कांरडे लेखाधिकारी राजेन्द्र बरकडे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp