


- बार्टी संस्थेत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त अभिवादन *
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस बार्टी संस्थेच्या विभागप्रमुख श्रीमती वृषाली शिंदे, शुभांगी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सुमेध थोरात, ग्रंथपाल वैशाली खांडेकर यांनी राष्टसंत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.
प्रा डॉ देवीलाल आठवले –
राष्ट्रसंत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती
यांनी गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना म्हणाले की, गाडगेबाबांनी समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा नाकारुन शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले तसेच आपल्या अभंगातून मानवतेचा प्रचार केला.
याप्रसंगी कार्यालय अधीक्षक डॉ संध्या नारखडे,प्रज्ञा मोहिते, विधी सल्लागार हेमंत आहिवळे,प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवते, महेश गवई, डॉ सारिका थोरात, शुभांगी सुतार यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन रामदास लोखंडे यांनी केले.
आभार प्रकल्प अधिकारी सुनंदाताई गायकवाड यांनी मानले.