बार्टी संस्थेमार्फत भारतीय वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) परीक्षा 2022 साठी आर्थिक सहाय्य योजना
पुणे – दिनांक ०३ जानेवारी प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत यावर्षी पासून भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा व भारतीय वनसेवा मुख्य परीक्षा या परीक्षेस पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी रक्कम रु. 50,000/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे आणि यु.पी.एस.सी. भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा व भारतीय वनसेवा परीक्षा या परीक्षांच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता पात्र उमेदवारास प्रती उमेदवार रक्कम रु. 25,000/- (एकरकमी) आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
दि. 23 डिसेंबर 2022 रोजी संघ लोकसेवा आयोगाने भारतीय वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सदर निकालानुसार भारतीय वनसेवा मुलाखतीकरिता (Personality Test) पात्र असलेल्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महासंचालक, बार्टी यांचेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in
> NOTICE BOARD> Indian Forest Service – Personality Test 2022 Financial assistance Scheme येथे भेट द्यावी.