लातूर / प्रतिनिधी : माय लाईफस्टाईल ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या माध्यमातून मोठ्या कष्टाने काम करून उदगीर तालुक्यातील बालाजी तोंडारे यांनी या कंपनीच्या लातूर जिल्हा कॉर्डिनेटर पदी विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे नुकताच ईद निमित्ताने ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माय लाईफस्टाईल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे टीम लीडर तात्यासाहेब इंगळे, फास्टेस्ट एनटीसी लीडर निजाम शेख सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





थोड्या दिवसात, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत कामात ठेवलेले सातत्य, जिद्द आणि आपल्या मेहणतीच्या बळावर बालाजी तोंडारे यांनी यश संपादन केल्यामुळे टीम लीडर शफीक पटेल सर, इरशाद शेख सर, नागनाथ गड्डीमे सर, ईश्वर सूर्यवंशी,बालाजी टाळीकोटे,भंडे मॅडम,जाकीर बागवान,सचिन मंगनाळे,आदींनी अभिनंदन केले आहे.