बुद्धवासी पद्मावतीबाई शेल्हाळकर यांचा स्मृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न
उदगीर / प्रतिनिधी : येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात श्री संत कबीर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा बुद्धवासी पद्मावतीबाई शेल्हाळकर यांचा ७ वा स्मृती दिनानिमित्त आभिवादन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायक कांबळे,डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रा.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते सुरज शेल्हाळकर,शिलरत्न शेल्हाळकर,सौ.चनावार मैडम,श्री गोडबोले सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक महिला
दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक बनसोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राज माता जिजाऊ,रमाबाई आंबेडकर,पद्मावतीबाई शेल्हाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री आचमारे यांनी केले तर कार्यक्रम यशसविते साठी यशवंतराव सोनवने,आंनद शेल्हाळकर,विश्वजीत सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले आहे.या वेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप ही करणत आले.
