
बोरोळ येथे प्रेरणादायी व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देवणी / प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील बोरोळ येथे श्रीनाथ कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विवेक सौताडेकर यांचे शिक्षण यशस्वी जीवनाचा पासवर्ड या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान देत असताना विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाबद्दलचे महत्त्व पटवून दिले. ग्रामीण भागामध्ये सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळते याची उदाहरण त्यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून दिले. याप्रसंगी दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व तसेच स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षेतील घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान व सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. तसेच याप्रसंगी श्रीनाथ पब्लिक स्कूलच्या चीमुनी व विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर भारदस्त असे नृत्य सादर केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच प्रमोद मनोहर पाटील हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक जनसेवा सेवा भावी प्रतिष्ठान चे अध्यक्ष गोविंदराव भोपनीकर हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातंब्रे, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डागवाले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजित बेळकोने, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौंड, कै. जनार्दन राजमाने विद्यालयाचे प्राचार्य निलेश राजमाने, डॉ.शिवाजी सोनटक्के, माझी सरपंच दीपक पाटील, एडवोकेट दयानंद देवणे,प्रगतशील शेतकरी बालाजी देवणे, माजी सरपंच औदुंबर पांचाळ हे होते. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण पवळे, पूजा गायकवाड, भाग्यश्री पांचाळ,लक्ष्मण देवणे,आरती शेंडगे,राजश्री पाटील, प्रतीक्षा बालूरे,मीरा येणकूरे इ.परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी बालूरे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल बालूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता हूरूचनाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला पालक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.