देवणी/ प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील बोरोळ येथील डॉ. भागवत धनाडे यांच्या शतायुषी क्लिनिक मध्ये नाविन्यपूर्ण आयुर्वेदिक मसाज केंद्राचे उद्घाटन होणार आहे. डॉ. भागवत धनाडे हे गेली वीस वर्षापासून सातत्याने रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत. त्यातच दि. 19 नोव्हेंबर पासून क्लिनिकमध्ये आयुर्वेदिक मसाज केंद्राची सुरुवात करण्यत येत आहे. या आयुर्वेदिक मसाज मुळे विविध शारीरिक व मानसिक व्याधी तसेच सांधे, स्नायू, मान, पाठ, कंबर, आणि गुडघेदुखीवर, विना औषध उपचार होणार आहे. तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा
या आयुर्वेदिक मसाज केंद्राचे उद्घाटन पुणे येथील प्रा. डॉ. कांत (स्वास्थ समाज रत्न तसेच अनेक राष्ट्रीय राज्य व पुणे महानगरपालिका पुणे यांच्याकडून कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित स्वास्थ तज्ञ) यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर लगेच डॉ. कांत यांचे स्वास्थ म्हणजे “नक्की काय असतं तुमचं आमचं वेगळं नसतं” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच आयुर्वेदिक मसाज समज गैरसमज मंत्र, तंत्र, आणि शास्त्र, या विषयावर विशेष मार्गदर्शन होणार आहे हे व्याख्यान दि. 19 नोव्हेंबर रोजी रविवारी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत लक्ष्मणात भिमनाथ सभागृह येथे होणार आहे. तरी या व्याख्यानाचा लाभ गावातील व देवणी परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आव्हान शतायुषी क्लिनिकचे डॉ. भागवत धनाडे यांनी केले आहे. हे व्याख्यान निशुल्क आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा.
