भगवान श्रीकृष्ण परमात्मार्थानी जातपात न मानता सर्वांना एकत्रित करून समप्रमाणात विचार मांडले पाहिजे — हभप गोविंद महाराज मुंडे

देवणी खुर्द कै रामराव हानंमतराव ‌मुराळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त श्री हरि किर्तनाला प्रचंड प्रतिसाद

युवकांनी पुढाकार घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे काटेकोर पालन करावे

देवणी प्रतिनिधी रणदिवे लक्ष्मण

भगवान श्रीकृष्ण परमात्मार्थानी जातपात न मानता सर्वांना एकत्रित करून समप्रमाणात एकत्र करणे महत्त्वाचे आहे तसेच युवकांनो पुढाकार घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदाचे काटेकोर पालन करावे असे प्रतिपादन प्रसिद्ध किर्तनकार हभप गोविंद महाराज मुंडे यांनी व्यक्त केले,
परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन आपल्या रसाळ वाणीतून म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी सर्व जाती- जमातीचे लोक एकत्र केलेत कोणी लहान – मोठे, गरीब -श्रीमंत , विद्वान- अविद्वान असा भेद केला नाही सर्वांना सारखा काला देऊन वितरण केले हा आदर्श आपल्याला व आजच्या समाजाला घेणे आवश्यक आहे. बोला विठ्ठल- विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक हरि ज्ञानदेव तुकाराम असे म्हणत आपल्या रसाळ वाणीतून भाविक भक्तांना हभप गोविंद महाराज मुंडे यांनी मंत्रमुग्ध केले, यावेळी यावेळी ‌कै रामराव हानंमतराव ‌मुराळे यांच्या प्रतिमेचे धनंजय मुराळे यांच्या हस्ते पूजन करून श्री हरि किर्तनाला सुरुवात करण्यात आली,गावकऱ्यांचा होता मोठा प्रतिसाद ‌व तसेच धनंजय मुराळे,सोनाली मुराळे, मनिषा मुराळे,शिवाजी कारभारी, संजय गरड, रतन गरड चेअरमन, नामदेव मुराळे, विश्वंभर बिरादार, कमलाकर बिरादार, विजयकुमार मुराळे,महादेव मुराळे, संजय मुराळे, सुनिल पाटील,बाळु गरड, पत्रकार रणदिवे लक्ष्मण यासह अनेक गावकरी युवक महिला पुरुष समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp