भावा-बहिणी मधील प्रेमाची नाळ घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज, स्त्रीकडे आदराने आणि सन्मानाने पाहण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज.
खरंतर हा सण, उत्सव कुटुंबा पुरताच किंवा आपल्या सख्ख्या बहिणी पुरताच मर्यादित न राहता व्यापक झाला पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या, शेजारीपाजारील, आपल्या संपर्कात येतील त्या आणि समाजातील प्रत्येक स्त्रीला आपण आपली आई, बहिण, आत्या, मावशी मानण्याची आपली मानसिकता निर्माण झाली पाहिजे. अणि हे जर प्रत्येक्षात प्रत्येकाच्या बाबतीत झाले तर समाजातील स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलेल, यामुळे प्रत्येकाची भावना ही शुद्ध होईल आणि स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची मानसिकता रहाणार नाही.. यामुळे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार आपोआप सपंतील.. मात्र याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करायला पाहिजे, म्हणून आपणही आपल्या सख्या बहिणीप्रमाणेच प्रत्येक स्त्रीला आपलीच बहिण या नात्याने, मानसन्मान देऊ प्रत्येक स्त्रीला चांगल्या भावनेने वागणूक देऊ आणि हे नाते शेवटपर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करू, ह्याच भाऊबीजेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
“बि मिडिया” माध्यम समुह