मंत्रिमंडळ विस्तारात ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ, या नेत्याने तारिख सांगितली

मुंबई : राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?

याच्या विविध चर्चा रंगल्या असून त्यावर अनेकांच्या आता प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं तर येत्या 8 ते 10 दिवसात होईल अशी अशा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याचे मानले जात होते. त्यानंतर आता गोगावले यांनीच याविषयी अधिक माहिती देताना मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याचे सांगत रायगडचा पालकमंत्री आपणच होणार असल्याचं सांगतिलं आहे.

तसेच ही विस्तार येत्या जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात होईल असेही ते म्हणालेत. तर यावरूनच शिंदे गटाचे दुसरे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखिल आपल्याला मंत्रीपद मिळेल. शिंदे हे आपल्याला मंत्री करणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. तर देवेंद्र फडणवीस हे आपला शब्द पाळतात. ते पाळतील ही. हा आजपर्यंतचा इतिहास असल्याचं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp