उदगीर : मराठवाडा मुक्तीदिन अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनता विकास परिषद शाखा उदगीरच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.निबंधाचा विषय होता ‘मराठवाडा मुक्ति अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवकांची विकासात्मक भूमिका’.या विषयावरील निबंध सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांकडून श्री हावगीस्वामी महाविद्यालयात लिहून घेण्यात आले होते.या स्पर्धेत महाविद्यालयीन गटातून पहिला येण्याचा मान संत तुकाराम विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अग्रिता नागेंद्रप्रकाश विश्वनाथे हीस प्राप्त झाला.पारितोषिक वितरण उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात मा.उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे साहेब व तहसिलदार रामेश्वर गोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रित्यर्थ कु. अग्रिता नागेंद्रप्रकाश विश्वनाथे हिला रोख रक्कम 3000 रुपये,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.तिचे संत तुकाराम विधि महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार नावंदर, प्रा. सौ.अश्विनी पाटील, प्रा. सौ दीप्ती नावंदर, डाॅ.रामप्रसाद लखोटिया,सामाजिक कार्यकर्ते प्रा.बाबूराव माशाळकर, प्रा. दत्ताहरी होनराव व वडील नागेंद्र प्रकाश आणि आई कल्पना विश्वनाथे यांनी अभिनंदन केले.तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
