मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर देवणी पुरस्काराने सन्मानित
देवणी प्रतिनिधी
देवणी– भारतीय रिझर्व बँकेच्या नेतृत्वाखाली क्रसील फाउंडेशनच्या सहकार्याने संबंध भारतामध्ये मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर उभारण्यात आले यांचाच एक उद्देश भारत देशामधील दीनदुबल्या आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचा सामाजिक आर्थिक घरगुती अर्थ संकल्प, बचत व गुंतवणूक, अटल पेन्शन, प्रधानमंत्री सुरक्षा विमा ,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा ,सुकन्या समृद्धी योजना , आर डी एफ डी डिजिटल व्यवहार,लोन,बँकींग लोकपाल,इतर शासकीय योजना ग्रामीन भागातील शेतकरी शेतमजूर महिला पुरुष यांना याचा परिपूर्ण माहिती व लाभ कसा घेयायचा हे मनीवाईज वित्तीय साक्षरता संबंध भारता मध्ये काम करत असुन महाराष्ट्रातील ५८ सेंटरचा स्टेट लेव्हलचा रिव्ह्यू मीटिंग रामभाऊ महाळंगी भाईंदर मुंबई येथे घेण्यात आला होता त्यात मनी वाईज वित्तीय साक्षरता सेंटर देवणी चे कर्मचारी सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे डीओ लक्ष्मीकांत मोरे जळकोट फिल्ड कॉर्डिनेटर दत्ता शिंदे निलंगा फिल्ड कॉर्डिनेटर जयश्री सोनकांबळे देवणी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचुन योजनांची माहिती देवुन दिलेले टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये चौथा क्रमांक मिळविल्या बद्दल सेंटर मॅनेजर हुसेन धोत्रे यांचा क्रिसील फाऊंडेशन चे हेड झोनल मा. शक्ती भिसे सर, मा. आमिता मॅम, मा. वैभवी मॅम, मा.आर एम राजीव बोबडे, सर मा.आर एम देविदास शिंदे सर, मा. सीनियर एरिया मॅनेजर सत्यपाल चक्रे सर, कॉलसेंटरच्या निपाणीकर मॅडम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला