आपला जिल्हा व तालुका आहे का त्यात..

मराठवाड्यात अवकाळीचा ६० हजार हेक्टरला दणका


छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख २२ हजार १८ शेतकऱ्यांच्या ६० हजार ४०२.४४ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये २४ हजार ६१५.३५ हेकटरवरील जिरायत, ३० हजार ३४८ हेक्टरवरील बागायत, तर ५ हजार ४३८.१९ हेक्टरवरील फळ पिकांचा समावेश आहे. प्रचलित भरपाईच्या नियमानुसार मदतीसाठी मराठवाड्याला ८४ कोटी ७५ लाख १९ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मार्चमध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला १ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु पंचनाम्यानंतर ६० हजार ४०२.४४ हेक्टर क्षेत्रावरील विविध शेती पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
🔹जिल्हानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टर)
जिल्हा…शेतकरी…बाधित क्षेत्र…अपेक्षित निधी (कोटी रुपये)
छ.संभाजीनगर…३५०१५…१३५३५.०७…२२.१७
जालना…४२१५…१९६९.४९..३.६७
परभणी…५९९९…३९६०.८१…४.३७
हिंगोली… ६५२६… ३८३८.७२…६.४
नांदेड…३६५४३…२१५७९.५०…३०.५२
बीड…८५०३…३८०२.०२…५.९९
लातूर…२२५६५…१०३६७.८३..१०.५६
धाराशिव…२६५२…१३४९…१.३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp