सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस.एन.चिकुर्ते यांचे विद्यार्थ्यांना आवाहन..
महाज्योती कडून शुक्रवारी टॅबची वितरण
लातूर / प्रतिनिधी : नागपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या महाज्योती वतिने एमएचटी- सीईटी, जेईई, एनईईटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी मोफत टॅब व सिम चा पुरवठा करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातून या योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी तारीख 17 सकाळी 11 वाजता टॅब व शिमचे वितरण करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड परिसरातील शिवनेरी गेट समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योती मार्फत कळविण्यात आलेल्या कागदपत्रांसह उपस्थित राहून टॅब व सीम प्राप्त करून घ्यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त आयुक्त समाज कल्याण एस.एन. चिकुर्ते यांनी केले आहे.
