मागासवर्गीय तरुणांना व्यावसायिक रोजगारक्षम शिक्षण उपलब्ध करण्यासाठी महाप्रित
च्या स्टार्टअप ज्ञान केंद्राची स्थापना
मुंबई, मार्च १७ (प्रतिनिधी):- मागासवर्गीय घटकांच्या सामाजिक उत्थानाला चालना देण्यासाठी तसेच या प्रवर्गातील व्यक्तींच्या सामाजिक विकासासाठी व्यावसायिक व रोजगारक्षम शिक्षण देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) च्या अंतर्गत ज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महाप्रित स्टार्टअप ज्ञान केंद्र (एम.एस.के.सी.) या नावाने संस्थेच्या स्वरूपात स्थापित सदर केंद्रामुळे उत्साही असलेल्या तरुणांना व्यावसायिक संधी देण्यासाठी सक्षम बनवले जाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांना जोडले जाईल.महाप्रित
च्या सोमवारी, १४ मार्च २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षा धोरणाचे (एन ई पी) उद्देश पूर्ण करण्यासाठी डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाप्रित
चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी यांनी सांगितले की, सध्याची शिक्षण व्यवस्था ही संरचित आणि महागडी आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे एक उद्दिष्ट ‘वर्तमान एकूण नोंदणी प्रमाण (जी ई आर)’ २६ ते ५० पर्यंत वाढवणे हे असल्याने डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मल्टीपॉइंट एंट्री/एक्झिट आणि अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स, वैयक्तिकृत शिक्षण या यासारखी इतर उद्दिष्टे देखील डिजिटल विद्यापीठाद्वारे पूर्ण केले जातील आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासासंबंधीचे सर्व कार्यक्रम विद्यार्थी केंद्रित तर असतीलच पण ते राष्ट्रीय कौशल्य पात्रता संरचना (एन एस क्यू एफ ) अनुरूप आणि उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी यांच्याशी जोडलेले असतील.
एम एस के सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस एस मंठा म्हणाले की, पारंपरिक विद्यापीठाला डिजिटल अॅप्लिकेशन्स म्हणून चालविणाऱ्या सर्व अॅप्लिकेशनचा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये समावेश करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ ई आर पी, एल एम एस, डिजिटल प्रलेख, मूल्यांकनाच्या आधारे रोजगार, इंटर्नशिप हे सर्व मल्टी टेनंट आर्किटेक्चर, मल्टी इन्स्टनस्ड आणि व्हाईट लेबलवरती एकाच प्लेटफॉर्ममध्ये एकत्रित केले जातील. ते पुढे म्हणाले की, सर्व काम हे ऑनलाईन करता येत नाही म्हणून शिक्षणाच्या मिश्र पद्धती म्हणजेच, दोन्ही-ऑनलाईन आणि ऑफलाईन, सुध्दा स्वीकाराव्या लागतील. त्या व्यतिरिक्त आभासी (व्हर्च्युअल) प्रयोगशाळा आणि इतर गोष्टींचा ही अंगीकार करावा लागेल.
सदर विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करेल जेणेकरून त्यांच्या अंतर्गत अर्थसाहाय (क्रॉस सबसिडी) एसपीव्ही बनवता येईल. त्याचप्रमाणे डिजिटल विद्यापीठाच्या ‘गैर-भौतिक’ मर्यादा मान्य करून त्याद्वारे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ (एम पी बी सी डी सी) आणि महाप्रित
च्या दुर्बल घटकांच्या लाभार्थ्यांसाठी संसाधने निर्माण करता येतील. डिजिटल विद्यापीठात कौशल्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व दिले जातील आणि यासाठी डिजिटल विद्यापीठ राज्यातील व राज्याबाहेरील विविध कौशल्य केंद्रांशी संयुक्त सहकार्य करेल.
त्याचप्रमाणे, महाप्रित
च्या उद्दिष्टपूर्तीसाठी भारतातील आणि परदेशातील अशा दोन्ही पारंपरिक तसेच ऑनलाईन विद्यापीठांबरोबर समकालीन सामग्री आणि रोजगारक्षम कौशल्ये मिळवण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.