राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे सुमारे 59 समाज घटक आहेत. त्यापैकी अनेक समाज अत्यंत अल्पसंख्यांक आहेत ते विकासाच्या परिघाबाहेर आहेत ते समाज घटक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत या लोकांना शासनाच्या अनेक सुविधांचा आणि योजनांचा लाभ मिळत नाही या समाजाच्या अनेक होतकरू आणि समाजाच्या भल्यासाठी अनेक पदाधिकारी तळागाळात काम करत आहे.
अशा कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेसाठी मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळत नाही परंतु होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्नावर अहोरात्र काम करणारे लक्ष्मण सुरनर यांना अत्यंत महत्त्वाचे पद दिले आहे याबद्दल महाराष्ट्रातील होलार समाजाच्या वतीने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय जयंतराव जी पाटील साहेब सुप्रियाताई सुळे, माननीय रोहित दादा पवार, माननीय पंडित कांबळे धन्यवाद यांना देत आहे.
आज पर्यंत होलार समाजातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक पक्षात सामाजिक चळवळीत काम करीत आहेत परंतु आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने होलार समाजातील कार्यकर्त्याला एवढे मोठे पद आजपर्यंत दिले नाही परंतु पवार साहेबांच्या पक्षाने होलार समाजातील निष्ठावंत आणि समाजासाठी आपला पूर्ण वेळ दिलेले माननीय लक्ष्मण सुरनर यांना संधी दिली आहे.
या पदाच्या माध्यमातून लक्ष्मण सुरनर होलार समाजाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करतील महाराष्ट्रातील होलार समाजात आनंद व्यक्त केला जात आहे.

