महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अधिवेशन लातूरला
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्घाटक तर पालकमंत्री अमित देशमुख स्वागताध्यक्ष
लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अधिवेशन रविवार दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी लातूर येथील दयानंद सभागृह बार्शी रोड येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तर स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख राहणार आहेत. मराठवाड्यातील सर्व मंत्री व प्रमुख संपादकांना निमंत्रित करण्यात आले असुन करोनानंतर वृत्तपत्र क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर चर्चा होणार असल्याने हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरेल. अशी माहिती संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यात पहिल्यांदाच पत्रकारांचे विभागीय अधिवेशन लातूर येथे आयोजित करण्यात आलेे आहे. एक दिवसीय अधिवेशनात करोनानंतर वृत्तपत्र व पत्रकारांसमोर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. यासाठी विभागीतील मान्यवर संपादक व ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी  बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, लातुरचे खासदार सुधाकर श्रृृंगारे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवी दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वीकारली असुन मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.
या अधिवेशनाला आठही जिल्ह्यातील एक हजार पेक्षा अधिक पत्रकार व संघाचे पदाधिकारी, विविध माध्यमात काम करणारे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने हे अधिवेशन ऐतिहासिक  होणार आहे. यावेळी मराठवाड्यातील ज्येष्ठ संपादक, पत्रकार आणि पेन्शनधारक पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी दिली. अधिवेशनाच्या तयारीसाठी लातुरचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक अशोक देडे यांच्यासह औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, परभणी जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.भास्कर भोसले, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील यासह विभागीय कार्यकारीणी आणि सर्व जिल्हा तालुका कार्यकारणी प्रयत्नशिल आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp