लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा लोककला व पथनाट्याद्वारे सर्वधर्म समभाव कला मंडळ प्रसार व प्रचार करीत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई च्या वतीने शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यांना विविध योजनांची माहिती होण्यासाठी लोककला व पथनाट्याद्वारे प्रचार व प्रसार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सर्वधर्मसमभाव कला मंडळ लोककला व पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात करून प्रचार व प्रसर करीत आहे. शासनाच्या विविध योजनेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई आणि माहिती कार्यालय, लातूर यांनी सर्वधर्मसमभाव कला मंडळाची निवड करून लातूर तालुक्यातील- लातूर गंजगोलाई, आर्वी, साई, बाभाळगाव, मुरुड, बोरगाव काळे, तांदुळजा औसा तालुक्यातील- औसा, उजनी, किल्लारी, लामजना, भादा, आलमला, मातोळा निलंगा तालुक्यातील -निलंगा, भुतमूगळी, कासारशिरशी, अंबुलगा, निटूर, पानचिंचोली, औराद शहाजानी या ठिकाणी कार्यक्रम सादर केले जात आहेत. सर्वधर्मसमभाव कला मंडळाचे अध्यक्ष लोकशाहीर अशोक शिंदे, ढोलकी वादक -अण्णा आबा आदमाने, पेटी मास्तर- सुधाकर भिमराव सवाई, कोरस गायिका- सुशीला श्रीराम रणदिवे, भक्ती श्रीराम रणदिवे, प्रभावती लिंबराज कोरस गायक- उत्तम मारुती साबळे, तुकाराम शिवाजी एडके, खंजेरी वादक- प्रदीप नागोराव शिंदे, अष्टपैलू कलाकार – प्रल्हाद दत्तू पुरी आपली कला सादर करीत आहेत. या कार्यक्रमासाठी गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, ज्येष्ठ नागरिक यांचे मोठे सहकार्य होत असून नागरिक व सामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनाची माहिती मिळत आहे. गावकरी व जाणकार मंडळी कलामंडळाचे समाधान व्यक्त करीत आहेत. या कार्यक्रमास नागरिक व गावकरी यांचा मोठा प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे.
