सुशिक्षित बेरोजगार युवकांचे मुख्यमंत्र्यांकडे हजारो मेल..!
लातूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात गेल्या तिन दिवसापासून कर्मचाऱ्यांनी पूकारलेल्या आभूतपूर्व आंदोलनामुळे शिक्षणाचे तिन तेरा, शेतकऱ्यांना फटकारा,महसूल विभागाचा उडाला बोजवारा यासह सर्व विभागातील कामकाज ठप आसताना शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे ठोस कार्यवाही होत नसताना मात्र बंद पडलेला महाराष्ट्र सावरण्यासाठी राज्यातील हजारो बेरोजगार युवक मात्र पात्रतेनुसार तात्काळ नियुक्ती देवून नौकरी देण्याची मागणी ते ही कोणत्याही आटीशिवाय नौकरी करण्याची मागणी आपल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे धडाडीचे मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांच्या मेल वर रोजच्या रोज करीत आसल्याचे दिसत आहे.
या निवेदनात बेरोजगारांनी आपल्या व्यथा ही
मांडल्या आहेत. कारण हि सर्व शेतकरी, शेतमजूरांची मुले आसून आमाला कोणत्याही स्वरूपाचा रोजगार उपलब्ध झाला नाही. मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा आणि कुटुंबाला आमचा आधार नसेल तर आमच्या जन्माचा काय फायदा..? आसा सवाल शासनापुढे उभा केला आहे.
तिन दिवसापासून राज्यातील शासकीय, निमशासकीय संस्था
चे कामकाज ठप्प झाले आसून आंदोलनातील कर्मचाऱ्यांना जो पर्यंत जूनी पेन्शन लागू होत नाही तो पर्यंत आंदोलन चालू राहणार आसे रोज बोलले जात आहे. हे आसेच चालू राहिले तर सरकाला काही तरी निर्णय घ्यावा लागेल व सुशिक्षित बेरोजगार युवकांना संधी देवून महाराष्ट्र चालवायला लागेल आशी शक्यता जाणार व्यक्त करीत आहेत.
