

महिला समुपदेशन व मदत केंद्र जळकोट येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी .
एक विभाजन घटक म्हणून कुटुंबांना एकत्र करण्याचे केंद्र आहे– काडवदे सचिन वैजनाथ
देवणी लक्ष्मण रणदिवे
जळकोट पंचायत समिती जळकोट कार्यालयातील महिला समुपदेशन व मदत केंद्र कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर काडवदे सचिन वैजनाथ (सहाय्यक प्रशासन अधिकारी )यांनी सावित्रीबाई फुले यांच्या व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.जी. नादरगे,यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेले कार्य व बालिका दिनावर मार्गदर्शन केले यानंतर महिला समुपदेशन व मदत केंद्र यांच्यातर्फे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावरून पदोन्नती सहायक प्रशासन अधिकारी म्हणून झाल्यामुळे काडवदे सचिन वैजनाथ,यांचा सत्कार बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.जी.नादरगे यांनी केले तर समुपदेशक मारुती सूर्यवंशी यांनी कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले भीमाशंकर स्वामी यांचा सत्कार केला यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर अगदी मन मोकळे विचार मांडले समुपदेशन केंद्र तुमच्या माझ्या हक्काचे आहे जर कोण्या महिलेवर अन्याय, अत्याचार त्रास तालुक्यातील गावात झाला तर समुपदेशन केंद्रात तक्रार नोंदवा. तुम्हाला योग्य न्याय मिळेल असे म्हणाले यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.जी.नादरगे, ए.एल.अकानगिरे, एम.पी बोईनवाड,गितेश्र्वरी मिरजगावे, घोरपडे, कासणाळे एस. एस ,हाळे, सामाजिक कार्यकर्ते रमेश धर्माधिकारी, सिद्धार्थ सूर्यवंशी व इतर कर्मचारी उपस्थित होते.