नांदेड / प्रतिनिधी :
ज्या -ज्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी नाकारलं…..
अशा पक्षाच्या उमेदवारां विरोध लढुन पाडण्याचा निर्धार…
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत व देगलूर-बिलोलीसह सर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची मातंग समाज कार्यकर्ते यांची घोषणा/निर्धार…..
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद गुंडले साहेब यांच्या नावाची तर अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या बिलोली-देगलूर मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब किंवा माजी सनदी अधिकारी व्ही.जे.वरवंटकर यांच्या नावाची घोषणा समाजाच्या वतीने आज झालेल्या बैठकीत करण्यात आली.
या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सनदी अधिकारी व्ही.जे.वरवंटकर, माजी सभापती प्रार्चाय बाबुराव पवित्रे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडले,लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रमुख रामचंद्र भरांडे, माजी जि.प.सदस्य चंद्रकांत घाटे,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक -अध्यक्ष सतिश कावडे,कॉ.प्रा.सदाशिव भुयारे,कॉ.गंगाधर गायकवाड, सुभाष अल्लापुरकर,एच.बी.बोरगावकर, गणेश अण्णा तादलापुरकर,प्रार्चाय मनोहर तोटरे,कॉ.अंबादास भंडारे, संतोष शिंदे, पत्रकार प्रल्हाद भंडारे,मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुर्यकांत तादलापुरकर, यादवराव सुर्यवंशी ,माधव वाडेकर इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले.
बैठकीचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन प्रा.देविदास इंगळे यांनी केले.
अभी…लढेंगे भी और जितेंगे भी!
जयलहुजी! जयभीम! जयअण्णा!