गंगाखेड / प्रतिनिधी : दि. ०८/ o२/ २०२२ . तथागत नगर येथे त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेड कर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सर माता रमाई सांगताना म्हणाले की स्वाभीमान काय आसतो ते रमाई कडून शिकले पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विदेशात आसतांना आणि त्यांचे सारसे सुभेदार रामजी बाबा यांच्या पच्छात त्यांचे खुप हाल झाले. त्यांना जो रामजी बाबांचा भक्कम पाठीबा आणि आधार होता. तो नाहीसा झाल्यावर कुटूंबातील सर्व जबाबदारी माता रमाई यांच्यावर आली. या काळात त्यांनी मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनीर्वाह केला. परंतु त्यांनी कुनाकडेही मदतीचा हात पसरला नाही. हा त्यांनी दाखवीलेला स्वाभीमान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वतेला आणि मोठे पणाला धक्का न लागता प्रपंच चालवला. ही माता रमाईची थोरवी सर्व स्त्रीयांना प्रेरणादाई आहे. तसेच सर पुढे म्हणाले की धारवाड येथे वराळे यांचे विद्यार्थी वस्तीगृह होते. तेथे माता रमाईच्या प्रकृतीला बरे वाटावे म्हणून रमाई रहायला गेल्या आसता तेथील वस्तीगृहाला ग्रँट न मिळाल्याणे विद्यार्यांच्या जेवनाचे हाल होत होते हे माता रमाईच्या करूनामय स्वभावाला पाहवले नाही. त्यांना भुकेची जानीव होती. म्हणुन त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काडून गहाण ठेवल्या व अवश्यक ते धान्य व इतर साहीत्य खरेदी करून स्वता: च्या हाताणे मुलांना जेवन करून वाढले. हा मुलांना आपल्या आईचाच हात वाटत होता. म्हणुन माता रमाई नऊ कोटींची आई झाली. आपल्या लेकरांची पर्वा न करता सर्व समाजच्या लेकरांची प्रगती व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेबांच्या राष्ट्रीयकार्यास धिराणे साथ दिली. असे मौलिक विचार मांडले. सर्व प्रथम महापुरुषांच्या प्रतीमांना पुष्प – पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयु. लक्ष्मण व्हावळे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशिल दिले. व मा. राहूल साबणे यांनी भिम गीत सादर केले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. विलासराव जंगले ( आण्णा ) हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आस्मिताताई अशोक ठोके यांनी केले. सुत्रसंचलन मा. लक्ष्मण व्हावळे यांनी केले. या कार्यक्रमास गंगाखेड नगरीतील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि महीला भगीनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थीती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तथागत नगरातील उपासक/ उपासीका यांनी परीश्रम घेतले. शेवटी प्रा. भगवान गायकवाड सर यांनी माता रमाई यांच्या जिवणावरील प्रेरणा गिताने कार्यक्रमाचा समारोप झाला. उपस्थीतांचे रावसाहेब मस्के यांनी आभार मानले.
🏵️🎙️✍🏻🎙️🏵️🎙️🏵️✍🏻🎙️🏵️✍🏻🎙️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp