
मानवी हक्क दिनानिमित्त मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने देवणी तहसीलदार यांना विविध मागण्याचे दिले निवेदन
श्री तुळजाभवानी क्लिनिक लॅबोरोटरी यांच्या कार्यालयात मानवी हक्क दिन साजरा
देवणी लक्ष्मण रणदिवे

मानवी हक्क अभियान दिनानिमित्त मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब, यांना विविध मागण्याची दिले निवेदन दिलेशोषित,शेतकरी, कष्टकरी,कामगार,महिला बालके व दुर्बल घटक यांच्या उन्नती व कल्याणाकरीता भारतीय संविधानाच्या सनदशीर मार्गाने सत्याचा आग्रह धरणारी अर्थात न्यायासाठी संघर्षात्मक लढा देणारी संघटना आहे,आम्ही या संघटनेचे कार्यकर्ते आहोत देशात भुमिहीनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असुन श्रमशक्तीवरचं त्यांचा उदरनिर्वाह भागवला जातो,काही प्रमाणात भुमिहीनांनी शासकीय गायरान जमिनी फार मोठ्या कष्टाने लागवडी लायक तयार करुन त्या जमिनीवर कसुन कुटुंब जगविण्या बरोबर देशाच्या उत्पन्नात भर घालुन एक प्रकारची राष्ट्राला मदतचं करीत आहेत,मात्र त्यांच्या ताब्यातील जमिनी आतापर्यंत त्यांच्या नावावर करण्यात आल्या नाहीत तर काही ठिकाणांचे त्यांच्या नावावर असलेल्या गायरान जमिनी सातबारा हुन उडविल्या चे ही प्रकार आढळुन आले आहेत,या १)सर्व गायरान जमिनी विनाअट कास्तकारांच्या नावे करण्यात यावे,२)सुप्रीम कोर्टाने आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आवश्यक असल्याचा निर्णय दिले आहे,या निर्णय प्रमाणे,राज्यसरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी डॉ.साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न ही पदवीधर देऊन सन्मानित करण्यात यावे, यासह अनेक लातूर जिल्ह्यासह अनेक मागणीचे निवेदन देवणी तालुक्याच्या वतीने देण्यात आले यावेळी आनंत साळुंखे जिल्हाध्यक्ष ,लक्ष्मण रणदिवे मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष, भोसले विलास दयानंद कांबळे गजानन गायकवाड देवणी तालुकाध्यक्ष, डी एन कांबळे शाहीर देवणी कार्याध्यक्ष, माधव सूर्यवंशी टाकळीकर, मुकेश कांबळे पंढरपूर, मारुती सूर्यवंशी अजनीकर, लक्ष्मीकांत मोरे ,जयश्री सोनकांबळे, महेश सोनकांबळे, प्रतीक मसुरे, शिवाजी जाधव मुकेश मसुरे मुकेश कांबळे माधव,दीपक सूर्यवंशी,कृष्णा पिंजरे पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर, लहू पाटील, ओमकार पाटील,लक्ष्मीकांत मोरे, हुसेन धोत्रे, यासह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.