मुंबईतील मुख्य पत्रकार संघटनांची उद्या संयुक्त बैठक :पुढील दिशा ठरणार
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिविगाळ आणि आज गुंडाकरवी केलेली मारहाण याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे.. मात्र या विषयावर संघटीत आवाज उठविणे आवश्यक आहे… म्हणूनच मुंबईतील प्रमुख पत्रकार संघटनांची उद्या शुक्रवारी दुपारी 1 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात तातडीची आणि महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.. बैठकीत पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करून ठोस निर्णय घेतले जाणार आहेत… येथे घेतल्या जाणारया निर्णयाची माहिती सर्वांना कळविली जाईल..
एस.एम देशमुख
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई