
मुख्यमंत्री पद हे मराठा समाजाला न्याय द्या — राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील
देवणी लक्ष्मण रणदिवे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद मराठा समाजाच्या आमदारास देण्यात यावे यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई राष्ट्रीय अध्यक्ष शिवसेना पक्ष तथा जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे हे निवेदन राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कारण निवडून आले आमदार एक मराठा समाजाचे असणाऱ्यालाच मुख्यमंत्री करा असे निवेदनाद्वारे कळवले आहे महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण देण्यात यावेत म्हणून मराठा समाजाच्या तळागाळाच्या कुणबी जनतेकडून आंदोलन करण्यात आले मात्र अद्याप मराठा समाजाला ओबीसींतुन आरक्षण देण्यात आले नाही याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा रोष आहे. महाराष्ट्र राज्याचे मुंख्यमंञी म्हणून मा.ना. श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे नांव शिक्कामोर्तब करण्याबाबत माध्यमातून चर्चा होत आहे. आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी म्हणून आपण जर मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांची निवड केली तर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या केलेल्या विरोधाचा आगामी येणाऱ्या महापालिका नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे विरोध करू. एवढेच नव्हे तर जो कोणी मुख्यमंत्री होईल त्यांना पण आमची ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षणाची देण्याची मागणी कायम असेल. त्यासाठी आम्ही नवीन येणाऱ्या सरकारला धारेवर धरू त्यामुळेच येणारी २०२९ ची लोकसभा निवडणुक आपणास जड जाईल. तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद मराठा आमदारास देण्यात यावे जेने करुन मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेल असा आमचा विश्वास आहे.
अंकुशराव शिवाजीराव पाटील,
राष्ट्रीय अध्यक्ष,राष्ट्रीय मराठा पार्टी.