मुख्याध्यापक अंकुश मुळे कोतवाल यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार.
देवणी प्रतिनिधी.
येथील विवेक वर्धनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश शंकरराव मुळे कोतवाल हे प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शाळेतर्फे सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
तसेच या शाळेचे नूतन मुख्याध्यापक म्हणून विनायकराव पाटील यांना पदोन्नती दिल्याबद्दल त्यांचा पण सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्केट कमिटीचे सभापती सदाशिव पाटील तळेगावकर उपसभापती दिलीप मजगे संस्थाचालक तानाजी पाटील तळेगावकर प्राचार्य डब्ल्यू एस कांबळे मुख्याध्यापक आर के बिरादार वसुनील क्षीरसागर माजी प्राचार्य जी एन सगर यांच्यासह शिक्षक श्रीमती शोभा पाटील अण्णाराव मोरे रावसाहेब जाधव गुणवंत कदम श्रीमती सरोजा सूर्यवंशी श्रीमती उर्मिला सगर घोणसेटवार आदी उपस्थित होते.
