शैक्षणिक क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव..

उदगीर / प्रतिनिधी : (सूर्यभान चिखले) : तालुक्यातील शेल्हाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली कमलाकर स्वामी यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२३ नुकताच जाहीर झाला आहे.
सदर पुरस्कार हा ओबीसी आधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने जाहीर करण्यात आला आसून या पुरस्काराचे वितरण १९ नोव्हेंबर २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पहिल्या राज्य अधिवेशनात वितरण करण्यात येणार आहे. आसे महासंघाच्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
अंजली स्वामी या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आसतांना एक वेगळी छाप तयार केली आहे. म्हणजे च विद्यार्थी प्रिय शिक्षिका, तंत्रस्नेही शिक्षिका, उपक्रमशील मुख्याध्यापिका म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याने आता पर्यंत आनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील लातूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व गावातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, पालक व विद्यार्थ्यांनी स्वामी मैडमचे अभिनंदन केले आहे.