शाळेत पाठवा नाहीतर १/- रु दंड भरा या शाहू महाराज यांनी काढलेल्या आदेशाला आज १०१ वर्षे पूर्ण..

मुलांना शाळेत पाठवा नाहीतर १/- रु दंड भरा या शाहू महाराज यांनी काढलेल्या आदेशाला आज १०१ वर्षे पूर्ण झाली. बहुजन समाजातील पोर शिकून मोठी व्हावीत या करिता प्रसंगी कठोर नियम करणारा राजा कुठं आणि पटसंख्या पुरेशी नाही म्ह्णून राज्यातील ५००० शाळा बंद करण्याचा आदेश काढणारे सरकार कुठे … गरिबांच्या मुलांनी शिकावे म्ह्णून राजकोषातून वसतिगृहे उभारली ,शिष्यवृत्त्या दिल्या कारण राजे शिक्षणाचे महत्व जाणून होते, म्हणून नेतृत्व शिकलेले असावे.