

रसिका महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न
देवणी प्रतिनिधी – देवणी येथील रसिका महाविद्यालयात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी/ वाढविण्यासाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्याअंतर्गत 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत ‘वाचन पंधरवडा’ राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी ग्रंथालय विभागात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये निबंधाचा विषय हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तक निवडून संपूर्ण पुस्तकाचे सखोल वाचन करावे व आपल्या आकलना प्रमाणे वाचलेल्या पुस्तकावर चिंतनात्मक व समीक्षणात्मक परीक्षण करून निबंध लिहावा आणि लिहिलेले निबंध दिनांक 15/01/2025 पर्यंत महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात संयोजक प्रा.डॉ. शिवाजी सोनटक्के यांच्याकडे जमा करावेत. या निबंधा मधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार असुन या विद्यार्थ्याना 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येईल याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी. निबंध हा मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषेपैकी कोणत्याही एका भाषेत लिहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ.शिवाजी सोनटक्के यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रंथालय कर्मचारी दयानंद रणदिवे, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.