घोटाळ्यामुळे टायपिंगचा निकाल अडकला
देवणी / प्रतिनिधी : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेतील (टिईटी) घोटाळ्याचा मोठा फटका शासकीय संगणक टायपिंगच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. गतवर्षी ऑक्टोंबर व नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल घोटाळ्यामुळे रखडला आहे. टायपिंग प्रमाणपत्राशिवाय नोकरीसाठी अर्ज करणे ही विद्यार्थ्यांना मुश्कील झाले आहे.
राज्यपरीक्षा परीषदेकडुन सहा महीन्यांतुन एकदा संगणक टायपिंग परीक्षा घेतली जाते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या परीक्षांना विलंब झाला होता. गतवर्षी ऑक्टोंबरमध्ये ऑफलाईन लघुटंकलेखनाच्या तर नोव्हेंबर मध्ये ऑनलाईन पद्धतीने संगणक टायपींगच्या परीक्षा घेण्यात आल्या या परीक्षेला राज्यभरातून दोन लाखाहुन अधिक विद्यार्थी बसले होते याच दरम्यान टीईटी घोटाळा उघडकीस आला पुणे पोलीसांनी राज्यपरीषदेच्या कारभाराची चौकशी सुरू केली. काही विभाग सीलही केले आहेत. त्यामुळे टायपिंग परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला. परीक्षा होऊन साडेतीन महीन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही निकालाबाबत कसल्याच हालचाली राज्य परीक्षा परीषदेकडुन झालेल्या नाहीत.
विद्यार्थ्यांची कोंडी
ऑक्टोंबर नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या टायपींग परीक्षेचा निकाल रखडल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसह विविध नोकरीसाठी टायपिंग प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अर्जही करता येत नाही.
पहिल्या परीक्षेचा निकाल लागल्याशिवाय दुसऱ्यापरीक्षेला विद्यार्थी पात्र ठरत नाहीत.
शिवाय या परीक्षेत अणुऊतीर्ण झाल्यास त्यांना रिपीटर म्हणुन पुढे परीक्षा देता येते पण पहिल्याच परीक्षेचा निकाल झाल्या नसल्याने रिपीटर म्हणुन परीक्षेसाठी अर्जही करता आला नाही.
फेब्रुवारी मार्च मध्ये टायपींग परीक्षा घोषीत केल्या आहेत, पण त्याही लांबणीवर पडणार आहेत.
परीक्षेनंतर 45 दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. पण साडेतीन महीने झाले तरी निकाल लागलेला नाही. हणमंत म्हेत्रे, पार्थ कॉम्पुटर इन्स्टिट्यूट देवणी ता देवणी जि लातूर