राज्य कर्मचारीयांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.
1) माहे- ऑक्टोबर 2021पासून महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% करणे..
(वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-2019/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021(शासन निर्णय संकेतांक 202110071550585405)
2) 1जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर2019 या 5 महिन्यांचा 5% महागाई भत्ता वाढी चा फरक माहे ऑक्टोबर च्या वेतना सोबत रोखीने अदा करणे..
(संदर्भ- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-1319/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021 (शासन निर्णय संकेतांक 202110071602270505 )
3)घरभाड़े भत्ता दरात वाढ करणे
● 8 % वरुन 9 % (ग्रामीण भाग/ Z कैटेगरी)
● 16 % वरुन 18% (Y कैटेगरी शहरी क्षेत्र )
●24 % वरुन 27% (X कैटेगरी महानगर क्षेत्र)
(संदर्भ :- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- घभाभ-2019 / प्र. क्र. 2 /सेवा-5 , दिनांक- 5 फेब्रुवारी 2019)
5फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेले आहे की, जेव्हा प्रचलित महगाई भत्ता DA- दर 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाड़े भत्ता(HRA) दरात X, Y, Z या प्रकारा नूसार अनुक्रमे 3% , 2% व 1% ची वाढ होईल..
त्यामुळे ज्या अर्थी आज महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% झाला आहे, म्हणजे महागाई भत्त्याची 25% मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या अर्थी ऑक्टोबर महिन्या पासून घरभाड़े भत्ता (HRA) दरात देखील वरील प्रमाणे आपोआपच वाढ होईल.