निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझं गाव विकताना पाहील

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी माझं गाव विकताना पाहिलं

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला…
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझं गाव विकताना पाहिलं

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझं गाव विकताना पाहिलं

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली

त्या वाहणा-या विषारी दारुत
आज माझं गावही वाहिलं,
मटनाच्या चुऱ्यापाई, पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
मी माझ गावं विकताना पाहिलं
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहिलं…..!

आणि रात्री मी गांव माझं विकताना पाहिलं


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp