रावणाचे दहन करणे म्हणजे एका समतावादी विद्वानाचे दहन करणे होय.
रावणाचे दहन करणे म्हणजे समतावादी तत्त्वाचे दहन करणे होय.
रावणाचे दहन करणारे विशमतावादी होत आणि म्हणून मनुवादी होत.
रावणाने आपल्या भूमीवर आक्रमण करणाऱ्याचा विरोध केला म्हणजे आर्य आक्रमणाचा विरोध केला. म्हणजे त्यांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आक्रमकांचा विरोध केला. त्यांच्याशी युद्ध करून योग्य तेच केले. म्हणून आपल्या देशाचे रक्षण करणारा रावण हा देशभक्त ठरतो. आणि त्याच्या भूमीवर आक्रमण करणारे अन्याय करणारे ठरतात. म्हणून रावण हा कुठल्याही दृष्टीने चूक ठरत नाही, दुष्ट ठरत नाही आणि म्हणून रावणाचे दहन हे एक प्रकारे चांगुलपणाचा व समतावादाचे दहन करणे होय. रावणाने कुठल्याही आर्य स्त्रीचा अपमान केला नाही. रामाने ज्याप्रमाणे रावणाची बहीण शूर्पनखेचे नाक कान कापून अपमान केला. त्राटिका या समतावादी बहिणीचा खून केला तसा रावणाने कुठल्याही स्त्रीचा अपमान केला नाही वाटत खून केला नाही. त्याने सीतेला हात सुद्धा लावला नाही, किंवा बलात्कार केला नाही. मग मोठा गुन्हा कुणाचा? तेव्हा सीता हरणाचा दोष देऊन रावणाला दहन करण्याइतके वाईट ठरवणे हा चूक नसताना महा गुन्हेगार ठरवणे होय.
जे लोक समतावादी आहेत, उच्चनीचता विरोधी आहेत त्यांनी रावण दहनाचा विरोध करायला पाहिजे.
जे लोक संविधानवादी आहेत, संविधानाला मानणारे आहेत त्यांनी देखील रावण दहनाचा विरोध करायला पाहिजे. कारण संविधानामध्ये समानता सांगितली आहे आणि रावण त्याच विचाराचा होता. म्हणजे आजच्या संविधानाचा विचार आणि रावणाचा विचार हे समान दिसतात.
म्हणून सर्व संविधान मानणाऱ्यांनी रावण दहनाचा विरोध करायला पाहिजे.
आम्ही बहुजन संघर्ष समिती व सत्यशोधक समाजाचे लोक तसेच सर्व समतावादी रावण दहनाचा निषेध करत आहोत.
सर्व बहुजनांना आमचे आवाहन आहे की त्यांनी रावण दहनाचा विरोध करावा. ज्या ज्या ठिकाणी रावण दहन होत असेल तिथे जाऊन बहुजनांना समतावादी रावणाचे महत्त्व सांगावे.