राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्यध्यक्ष महाराष्ट्र मा.श्री.सुरज दादा चव्हाण यांना देवणी तालुका राष्ट्रवादी च्या वतीने विविध विकास कामाचे निवेदन.

देवणी / प्रतिनिधी (रणदिवे लक्ष्मण) :

देवणी तालुक्यातील सावरगाव,अजनी, देवनी (खु ) ग्रामपंचायत विकास कामासंदर्भात मा.श्री.सुरज दादा चव्हाण प्रदेश कार्याध्यक्ष तथा लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य यांना शिरूर आनंतपाळ येथे भेट घेऊन विविध कामाच्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळेस राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे देवणी तालुका अध्यक्ष श्री.लक्ष्मण रणदिवे व सावरगावचे उपसरपंच पती पंढरी जोळदापके. त्यांच्यामार्फत तिन्ही गावातील विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच तोगरी ते तूरोरी मोड राज्यमार्ग यांच्या संथगतीने काम चालणाऱ्या कामाबद्दल चर्चा करण्यात आली. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान आदरणीय सुरज दादा चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले. सर्व विकास कामासंदर्भात आदरणीय दादाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देऊन देवणी तालुक्याच्या विकास कामासाठी जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp