राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी मंत्रालयात जाऊन देवणी तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी केले प्रयत्न

देवणी / प्रतिनिधी : ग्रामीण व शहरी भागातील गरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेअंतर्गत वीज उपलब्ध झाली. त्याबद्दल महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.श्री.ना.डॉ.नितीन राऊत साहेब यांची भेट घेऊन आभार मानले. व तसेच देवणी तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्वरित मंत्रीमहोदयांनी संबंधितांना आदेश देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मनोज कन्नाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवणी तालुका कार्याध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.अनिल कांबळे, अंबानगरचे सरपंच तथा संचालक राष्ट्रवादीचे
श्री.अनिल रोट्टे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष श्री.संदीप पाटील उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी देवणी तालुक्यातील अनेक विषयांवर मंत्रालयात जाऊन मंत्र्यांना भेटुन निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp