देवणी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंञी नवाब भाई मलीक यांच्या वर सुडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी सकाळी आकरा वाजता बोरोळ चौक येथे देवणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आली,”भाजप हमसे डरती है’ इडी को आगे करती है, एक नवाब सौ जवाब, नवाब भाई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ! या जयघोषाने परीसर दुमदुमला होता
अंदोलन कर्त्यानी देवणी तहसीलचे नायब तहसीलदार सौ.माडजे मॕडम यांना निवेदन सादर केले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.अनिल इंगोले,अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महासचीव प्राचार्य फकरोद्दीन बुदरे,कृ.उ.बा.स.चे सभापती शांतवीर कन्नाडे यांच्या नेतृत्वाखाली हि निदर्शने करण्यात आली,यावेळी अनेक मान्यवरानी केंद्र सरकार इडीचा वापर कशा पद्धतीने करून घेतो यासंदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले. प्रामुख्याने या अंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचीव मनोज कन्नाडे कार्याध्यक्ष अनिल कांबळे,डाॕ मल्लीकार्जुन सुरशेट्टे,जितेंद्र शिवगे,अमरदिप बोरे,माजीद तांबोळी,महेश जाधव,सचिन गवळी,गफुर शेख,शकिल मनियार,लक्ष्मण रणदिवे,कृष्णा पिंजरे,दत्ता चाळकापुरे,सिद्धेश्वर पाटील,असलम तांबोळी,ओमकार पाटील,सचिन घाळे,सोमनाथ पाटील,वैभव म्हञे,आविनाश गरड, सोहेल शेख यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते व तसेच हे अंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडला! यावेळी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता