राष्ट्रीय आदिमुराई मार्शल आर्ट स्पर्धेसाठी विश्वजीत येणकुरे खेळाडूंची निवड

देवणी / प्रतिनिधी :
तालुक्यातील बोरोळ येथील विश्वजीत तानाजी येणकुरे यांची चौथ्या राष्ट्रीय आदिमुराई इंडियन मार्शल आर्ट स्पर्धेसाठी करपगाम विश्वविद्यालय, कोयंबतूर, तमिलनाडु येथे 28 ते 31 मार्च 2022 कालावधीमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेकरिता महाराष्ट्र टीम मध्ये त्यांची निवड झाली असून हे खेळाडू प्रशिक्षक संतोष तेलंगे, विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले असून पुढे मुख्य प्रशिक्षक के.वाय.पटवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रा.डॉ.फारूक तांबोळी, ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे कार्याध्यक्ष पी.वाय.आतार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण पेठकर , महाराष्ट्र राज्य शिक्षक कृती समितीचे उपाध्यक्ष अंगद भोसले, प्रा सुनील पाटील बोरोळकर, प्रा नवनाथ खुळे, प्रताप कोयले, माजी ग्रा.पं.सदस्य प्रा.प्रितम कोंगे, युवराज देवणे सह आदिने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp