
देवणी
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून पर्यावरण विषयक जनजागरण होणे गरजेचे असून नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाबरोबर पर्यावरण विषयक जाणीवा समृद्ध होणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागात डिजिटल संगणक साक्षरतेचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मा.श्री. गजाननजी भोपणीकर यांनी केले. देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाच्या वतीने मौजे आंबेगाव ता. देवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री. सागर वरंडेकर (गटविकास अधिकारी, देवणी) उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सरपंच मुक्ताबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य राम घंटे, रेखा सचिन जाधव, श्री संभाजी जाधव (मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा आंबेगाव) उपप्राचार्य
डॉ.शिवाजी सोनटक्के,
ग्रामसेवक स्वामी, श्री व्यंकटराव शिंदे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम जाधव, प्रा. धनराज बिराजदार, शंकर म्हेत्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गोपाल सोमानी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पुरुषोत्तम मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.