शेख युनुस राहुरी : गेली दोन वर्षांपासुन शेतकऱ्यांवर आस्मानी संकटामुळे स्वायाबीण कांदा कपाशी हे पिके अती पावसाने उपळुण गेली मुख्य पिक असलेल्या ऊसाला हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने तो ऊस कवडीमोल भावाने गेला व शासनाने नुकसान भरपाई चे कुठलेही अनुदान दिले नाही शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेला दुध व्यावसाय तोटय़ात आहे पेट्रोल डिझेल रासायनिक खते किटक नाशक पशु खाद्य यांच्या किमती गगनाला भिडल्या यावर सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे,त्यातच साखर कारखानदारांनी मागील हंगामातील ऊसाचे दुसरे प्रमेन्ट न केल्याने दिवाळी सारख्या मोठ्या सणाला शेतकरी यांनी आपल्या कुटुंबातील कोणालाच नवीन कपडे न घेताच आहे त्या परिस्थितीत दिवाळी सणाचे स्वागत करून आपल्या कुटुंबासाठी व देशाच्या हितासाठी कंबर कसून आपल्या शेतात कांदा हरबरा गहु अशा पिकाची पेरणी व लागवड करण्याच्या तयारीत असताना व लागवड केलेल्या पिकाला हमी भाव नसतानाही शेतकरी रक्ताच पाणी व रात्रीचा दिवस करत असुन पाणी असताना पिके जळुन चाललेत व आजही अवकाळी पाऊस गारपीट येणा-या हवामान अंदाज देत आहे अशा एकुण प्रतिकुल परस्तीत ऊर्जा विभाग यांच्याकडुन चुकीची विज बिल आकारणी करुन विज न वापरताही बिल आकारणी करुन महावितरण अधिकाऱ्यांमार्फत चालु लाईट बंद करुन सक्तीची पठाणी वसुलीने सुलतानी संकट राहुरी तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांपुढे उभे केले व शेतकऱ्यांवर चोरीचे गुन्हे दाखल करुन दंडात्मक कारवाई होत आहे त्यामुळे राहुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला असुन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ ऊर्जा विभागाचे आधिकारी व पदअधीका-यांनी आणली आहे असे लांबे म्हणाले,
गेल्या महिन्यात ऊर्जा विभाग महावितरणाच्या सक्तीच्या विज बिल वसुलीच्या विरोधात लोकनायक नामदार बच्चुभाऊ कडु यांच्या प्रहार जन शक्ती पक्षांच्या वतीने लोकशाही मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी राहुरी मार्केट यार्ड समोर आंदोलन केले ते आंदोलन प्रस्थापित पुढा-यांनी सत्तेचा गईर वापर करून पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आंदोलन मोडीत काढुन आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन आंदोलकांना 15 दिवस अटक करून शासन व प्रशासन यांकडुन लोकशाहीचा व शेतकऱ्यांचा घात करून लोकप्रतीनिधीनी आपली खरी ओळख करुन दिली ज्या शेतकऱ्यांच्या नावावर निवडुण आले त्या शेतकऱ्यांवर आज पच्छातापाची वेळ आणली सत्तेवर नसताना व निवडुक प्रचारात तेलंगणा रांज्या प्रमाणे शेतकऱ्यांना मोफत वीज द्या व देऊ अशा वल्गना करणारे आता गंप्प का एका जत्राने देव म्हतारा होत नाही या म्हणी प्रमाणे आता येणा-या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवतील या पुढील काळातही शेतक-याच्या प्रश्नावर आंदोलन केले जाईल शेतकऱ्यांनी राजकारण सोडुन आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे असे मत लांबे यांनी व्यक्त केले
