रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका देवनी येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.
देवणी / प्रतिनिधी : आज दिनांक 20/8/2023 रोजी देवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय बाबासाहेब जी कांबळे जिल्हाध्यक्ष लातूर, उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा निरीक्षक माननीय राजाभाऊ ओव्हाळ , मुख्य मार्गदर्शक म्हणून मराठवाडा सरचिटणीस देविदासजी कांबळे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य एस के चेले,,रिपाईचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण तिकटे, सुनील व्हावळे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, अहमदपूर तालुका अध्यक्ष अरुण भाऊ वाघम्बर, उदगीर तालुका अध्यक्ष प्रफुल्ल कुमार उदगीरकर, चाकुर तालुका अध्यक्ष पपन कांबळे, रेनापुर तालुका अध्यक्ष महादेव साळवे, देवणी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,तालुका सरचिटणीस धनराज गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बालाजी सोनवणे, सचिव पुष्पक सूर्यवंशी, मातंग आघाडी तालुका अध्यक्ष गंगाधर जिरे, ओबीसी तालुका अध्यक्ष अक्षय टिळे,उपाध्यक्ष राजु कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भीम दर्शन बोरे, वलांडी शाखा अध्यक्ष दयानंद बनसोडे, विठ्ठल गायकवाड,सह तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचा आढावा देवणी तालुका अध्यक्ष गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर यांनी जिल्हा निरीक्षक राजाभाऊ ओव्हाळ यांच्याकडे सादर केला.