उदगीर/ प्रतिनिधी : आज दिनांक 17 जून 2023 रोजी कोळखेड येथे स्मार्ट योजनेअंतर्गत रिफार्मर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या सदस्यांना केडीएस 726 या बियाण्याच्या 30 ब्यागा वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी योजना स्मार्ट अंतर्गत राज घेतलेल्या शेतकरी शेती शाळा दुसऱ्या वर्गामध्ये कंपनीला आलेल्या के डी एस ७२६ या वाणाच्या 30 बॅग चे वाटप माननीय तालुका कृषी अधिकारी उदगीर श्री संजय नाबदे, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री नितीन दुरुगकर यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री संदीप अंधारे यांच्या हस्ते व कृषी सहाय्यक सौ तोडकरी मॅडम यांच्या उपस्थितीत तसेच कार्यक्रमाचे नियोजन करणारे श्री रणजीत मुचेवाड कार्यकारणी सदस्यश्री महेश बिरादार , श्री गजानन पाटील, श्री किरण तांबोळीकर , सौ शोभा कोंडमारे , सौ श्रुती बिरादार , सौ प्रयागबाई गायकवाड, सौ अनिता कांबळे इत्यादी सदस्य व कार्यकारिणीचे सभासद उपस्थित होते.
