आहमदपूर / प्रतिनिधी : इंदिरा गांधी प्राथमिक रेणुकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर (महापूर) येथे क्रांतीजयोती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व गीत सादर केले.या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन उच्च माध्यमिकच्या मुली कु.गलांडे,कु.टोंपे व कु.आव्हाड यांनीच केले.त्यांना श्री शेख सरांनी मार्गदर्शन केले होते.या प्रसंगी इयत्ता 8 वी च्या मुलामुलींनी एक लघु नाटिका सादर केली.श्री.चिकुर्ते सरांनी नाट्यदिग्दर्शन केले.अध्यक्ष गोजमगुंडे मॅडम,प्रमुख पाहुणे श्री.काळे सर,मार्गदर्शन ज्योती खंदाडे मॅडम तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक चे सर्व विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम संपन्न केला. सदर कार्यक्रमाची राष्ट्रगिताने सांगता झाली.
