लक्ष्मण होनमाने यांचे निधन
देवणी : येथील लक्ष्मण शामराव होनमाने वय 85 वर्षे साठे नगर देवणी येथील राहत्या घरी आज दिनांक २१-०१-२०२३ रोजी सकाळी ६.३५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ४.०० वा सार्वजनिक समशान भूमी येथे होणार आहे.
आपल्या जिवनामध्ये मितभाषी आसलेले लक्ष्मण होनमाने स्वभावाने मनमिळावू व सर्वांच्या सहकार्याला पडणारे व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित होते.स्वतः निरक्षर आसले तरी शिक्षण हे माणवी जिवनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते म्हणून आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण दिले व आपल्या पायावर उभे केले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली नातूपंतू आसा मोठा परिवार आहे. ते पेंटर बंडेप्पा होनमाने यांचे वडील होत.

