लातूर / प्रतिनिधी : श्री विश्वकर्मा देवस्थान लातूर येथे आज ॲग्रो इंडिया दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.या वेळी संपादक बालाजी टाळीकोटे,उपसंपादक सुदर्शन बोराडे, विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष जगन्नाथ लोहारे, कार्याध्यक्ष वसंतराव पोतदार, उपाध्यक्ष भगवानराव पांचाळ, उपाध्यक्ष भास्कर विश्वकर्मा, कोषाध्यक्ष मारुतीराव सुवर्णकार, सचिव माधवराव पांचाळ, सहसचिव रंगनाथराव सुतार, विश्वकर्मा विकास महामंडळ अध्यक्ष भागवत पांचाळ, सुदाम पांचाळ युवा अध्यक्ष सौरभ सुतार,प्रतिक पांचाळ आदी समाज बांधव उपस्थित होते.व्रतपत्र ॲग्रो इंडिया दिनदर्शिका हि आद्यावत माहिती व सुरेख व अकर्षक छपाईमुळे दिनदर्शिकेचा दर्जा उत्तम राखण्यात आल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना आवश्यक वाटणारी दिनदर्शिका पाहून समाधान व्यक्त करण्यात आले.

