भीमजयंतीला सार्वजनिक अध्यक्ष मंडळ करणार दलित जेष्ठ पँथर्सचा गौरवसह देणार विविध कार्यक्रमांची मेजवानी.

लातूर / प्रतिनिधी :
लातूर शहरात यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी सार्वजनिक जयंती 14 एप्रीलला मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दलित पँथर या लढाऊ, विद्रोही संघटनेच्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने सार्वजनिक जयंती महोत्सव अध्यक्षीय मंडळाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील दलित पँथर च्या जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
या शिवाय विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत. अशी माहिती आज 29 मार्च रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सार्वजनिक अध्यक्ष मंडळाने सांगितले.
दि. 14 एप्रील रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त आंबेडकरी जलसा, नामवंत साहित्यिकांची व्याख्याने, लातूर जिल्ह्यातील कलावंताचा भीम गीताचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षीय मंडळाचे अध्यक्ष ॲड. विजयकुमार अवचारे, रोहित कांबळे, सचिन गायकवाड, विनोद कोल्हे, रणधीर सुरवसे, ॲड. आनंद सोनवणे, इंजिनीयर सचिन गायकवाड, अमन सुरवसे, सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रा. डॉ. जितेंद्र गायकवाड, गौतम सूर्यवंशी, रुपेश गायकवाड, राहुल बनसोडे, ॲड. यशवंत चव्हाण, ॲड. राहुल कांबळे, जय ढगे यांच्यासह मोहन माने, चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे, लक्ष्मण कांबळे आदी ज्येष्ठ मार्गदर्शकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp